राजापूर तालुका बौध्दजन संघ गट क्र १चा विद्यार्थि गुणगौरव आणि माजि कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न…!
कोकणातील आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे केंद्र असलेल्या राजापुर तालुका बौध्दजन संघ रजि. मुंबई आणि या संस्थेस सल्लग्घ असणार्या गट क्र १.
रत्नागिरी जिल्हातील सह्याद्रि पर्वत रांगात वसलेल्या गट क्र १ मधिल राजापुर तालुक्यातील आणि लांजा तालूक्यातील दुर्गम गावांचा धार्मिक चळवळीशी अत्यंत मोलाचा वाटा असुन दि.चि.ज. भांबेडकर यां सारखे आंबेडकरी चळवळीला आणि धर्मातरांसारखा सामाजिक बदल घडविणारे कार्यकर्ते दिले.
त्यांचे कार्य प्रामुख्यान पुढे नेण्याचे काम दि.जी.जी.जाधव आणि सहकारी यांनी जोमाने पुढे नेले.
सामाजिक आणि धार्मिक चळवळ गतीमान करण्याकरिता ग्रामिण आणि मुंबईतील रहिवाश्यांना त्याची जागृती निर्माण करण्याचे कार्य गट क्र १ करत असुन चळवळीला पोषक असे कार्य त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत .
त्याचाच एक भाग म्हणुन
रा.ता. बौ.संघ गट क्र.१ मुंबई
यांनी गटातील यशस्वि विद्यार्थ्यांचा गुण गौरव व संघटनेला सतत कार्यरत ठेवुन धार्मिक,सामाजिक कार्यात वाहुन घेतलेल्या माजी कार्यकत्यांच्या कामाचा सत्कार सोहळा ऐतिहासिक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह अर्थात बौध्दजन पंचायत समिती मुख्ख कार्यालय भोईवाडा परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक सिध्दार्थ काॅलेज प्राध्यापक मा. विजय मोहिते हे उपस्थित होते. विद्यार्थांना बाबासाहेबांचा आदर्श घेण्याचे आव्हाण करतांना बाबासाहेबांनी १८तास अभ्यास करुन जो ज्ञानाचा जागतीक रेकाॅर्ड केला त्यांचा आदर्श घेवुन आपले शिक्षण पुर्ण करावे.आपले शिक्षण हे समाजासाठी असावे तरच ते उपयोगाचे व महत्वाचे अन्यथा ते व्यर्थ असे सांगितले.
उपस्थित पालकांना रामजी बाबांसारखे कार्य करा असे आव्हाण केले.
सदर कार्यक्रमात जेष्ठ कार्रकर्ते मा.विश्राम जाधव,मा.पांडुरंग कदम,मा.शांताराम कांबळे आदि माजी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी रा.ता.बौ.संघ मुंबईचे पदाधिकारी,संघ शिक्षण समितीचे पदाधिकारी तसेच गटाचे ग्रामिण चे अध्यक्ष मा.संतोष कांबळे आणि कार्यकारि मंडळ उपस्थित होते.
गट १चे अध्यक्ष मा.संजय भांबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला तर सरचिटणीस मा.स्वप्निल कदम यांनि सुत्र संचालन केले तर गट क्र१ अंर्तगत शिक्षण समितीच्या मा.अनिल जाधव,प्रस्ताविक आणि चिटणीस मा.सुमेध प्रभुलकर ,सहसुत्रसंचलन केले.गट१ अंर्तगत शिक्षण समितीने कार्यकत्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन सुंदर आयोजन करुन कार्यक्रम पार पाडला.
शेवटी सर्वांचे आभार मानुन कार्यक्रम समाप्त झाला.